Weather Update : पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस

एमपीसी न्यूज : हवामान खात्यानं मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र वाढल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 11 सप्टेंबर रोजी रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर 12 सप्टेंबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नंदुरबार, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.तर कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस वाढण्याची शक्यता असून,12 आणि 13 सप्टेंबर रोजी पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात शनिवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.वसई-विरार महानगरपालिका आणि पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केले आहे.

आयएमडीनुसार येत्या 5 दिवसात मध्य महाराष्ट्र, कोकण, गुजरात राज्यात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. बुधवारी देखील, मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पूरस्थिती कायम आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.