Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात गारांचा जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज – पिंपरी (Pimpri)-चिंचवड शहरात सोमवारी (दि. 29) सायंकाळी विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला. धुवादार पावसाने बॅटीग केल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली.
Pimpri Chinchwad RTO : पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन
सोमवारी सकाळी उन्हाचा कडाका जाणवला. दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. ढग दाटून आले आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. पिंपरी (Pimpri) -चिंचवड शहरात गारांचा पहिलाच पाऊस नागरिकानी अनुभवला. ठिकठिकाणी पाण्याचे तळे काही तासात साचले. त्यातच वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या. नोकर वर्गाची घरी जाताना धांदल उडाली.
सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. चाकरमानी कामावरून घरी जात असताना पाऊस आल्याने कामगारांनी दिसेल तिथे आडोसा घेतला. नाले पहिल्याच पावसात वाहू लागले. पावसात शहरवासियांचे चांगलेच हाल झाले. तर अनेकजण पावसाने सुखावले. चिमुकले घराबाहेर गारा जमा करताना दिसून आले.पुढील काही दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.