Weather upadate : पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार !चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

एमपीसी न्यूज : राज्यात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागा कडून वर्तवण्यात अली आहे. 28 आणि 29 डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस  आणि गारपिटीची वर्तवण्यात आली आहे

हवामान खात्याने उद्या अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट  जारी केला आहे.तर गोंदिया, औरंगाबाद आणि जालना या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

 उद्या नाशिक, जळगाव, धुळे, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत अंशत: ढगाळ हवामान राहणार आहे. संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. बुधवारी 29 नोव्हेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. बुधवारी नागपूर, भंडारा आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

तर गडचिरोली येथे येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे 27 आणि 28 डिसेंबर रोजी उत्तर-पश्चिम हिमालयीन प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्किम राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

तर 28 आणि 29 डिसेंबर पूर्व मध्यप्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड विजांच्या गडगडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला आहे. त्याच बरोबर येत्या 2 दिवसांनंतर मध्य व पूर्व भारतात 2 ते 4 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान घसरण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.