Pimpri: पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर, बारा तासात 72 मिमी पाऊस, चार टक्यांनी साठ्यात वाढ

Heavy rainfall in Pavana dam area, 72 mm rainfall in 12 hours, increase in stock by 4%.

एमपीसी न्यूज – सोमवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस आज (मंगळवारी) दिवसभर कोसळत आहे.  पवना धरण पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर आहे. सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आ 12 तासात धरण क्षेत्रात 72 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे दिवसभरात धरणातील पाणीसाठ्यात चार टक्क्यांनी वाढ झाली असून साठा 36.65 टक्के झाला आहे.

पावसाने ओढ दिल्याने पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरणातील पाणीसाठ झपाट्याने कमी होत होता.

पावसाळ्यातील जुन, जुलै दोन महिने संपल्याने शहरवासीयांवरील पाण्याचे संकट गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

पण, ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात झाली आहे.

सोमवारी रात्रीपासून पाऊस पडत आहे. आज मंगळवारी दिवसभर देखील पाऊस सुरु आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा चांगलाच जोर होता.

आज सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या 12 तासात धरण क्षेत्रात पाणलोट 72 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे पाणी साठ्यात चार टक्क्यांनी वाढ झाली असून साठा 36.65 टक्के झाला आहे.

आजपर्यंत 633 मिली मीटर पाऊस पडल्याचे पवना धरणाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अन्वर तांबोळी यांनी सांगितले.

दरम्यान,  सकाळी धरणात 32.43 टक्के पाणीसाठा होता. आता 36.65 टक्के झाला आहे. दिवसभरात 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.