Pune Weather : येत्या शनिवारपर्यंत पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा; मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारी

उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री कटारे यांनी शहर आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना याविषयी दक्षता घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. Heavy rains expected in Pune District till Saturday, helpline number released.

एमपीसी न्यूज – पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात येत्या शनिवार पर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या कुठल्याही भागात अतिवृष्टी झाली तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि मदतीसाठी प्रशासनाने दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री कटारे यांनी शहर आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना याविषयी दक्षता घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी शोध पथक बचाव पथक तयार ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास तातडीने बचावकार्य सुरू करावे आणि जुन्या किंवा मोडकळीस आलेले पूर्ण इमारती येथील वाहतूक तात्पुरती वळवावी किंवा थांबविण्यात यावी असे स्पष्ट आदेश ही देण्यात आले आहेत.

वीज पडण्याची शक्यता असलेल्या जागांची आगाऊ माहिती मिळवण्यासाठी नागरिकांनी ‘दामिनी लाईटनिंग अलर्ट ॲप डाऊनलोड करावे.

आपत्तीच्या  काळात काही मदत लागली तर नागरिकांनी ०२०-२६१२३३७१ किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. कटारे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.