Lonavala: लोणावळ्यात पावसाचे जोरदार पुनरागमन, रात्रीतून पडला 81 मिमी पाऊस

Heavy rains in Lonavala, 81 mm of rain fall overnight धरणातील पाणीसाठा वाढत नसल्याने सर्वांना भविष्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता भेडसावत होती.

एमपीसी न्यूज- मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे सोमवारी मध्यरात्रीपासून जोरदार पुनरागमन झाले. सोमवारची रात्र ते मंगळवारची सकाळ दरम्यान शहरात 81 मिमी पावसाची नोंद झाली. सकाळपासून पावसाचा जोर व संततधार कायम आहे.

जून महिन्यात पावसाला सुरूवात झाली. मात्र जून व जुलै या दोन्ही महिन्यात लोणावळा शहरात केवळ 1510 मिमी पाऊस झाला होता. मागील वर्षी सोमवार अखेरपर्यत लोणावळ्यात 4176 मिमी पाऊस झाला होता.

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी फार कमी पाऊस झाल्याने नागरिक चिंतातूर झाले होते. धरणातील पाणीसाठा वाढत नसल्याने सर्वांना भविष्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता भेडसावत होती. त्यातच सोमवार रात्रीपासून जोरदार पावसाला सुरूवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.