Pune : पुण्यात जोरदार पाऊस सुरू

एमपीसी न्यूज – पुण्यात आज सायंकाळी 5.30 वा. पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. आज सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. जोरात पाऊस होत असल्याने झोपडपट्टी धारकांत घबराट निर्माण झाली आहे. तर, प्रशासनानेही पावसाचा धसका घेतला आहे.

नोव्हेंबर महिना सुरू झाला तरीही पाऊस काही थांबायला तयार नाही. 5 नोव्हेंबर नंतर आणखी अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. जोरात पाऊस होत असल्याने कामगार वर्गात भीती निर्माण झाली आहे. 4 ते 5 किमी पर्यंत जाण्यासाठी तासनतास लागत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.