Talegaon : भर पावसातही सुनील शेळके यांच्या तळेगावातील दुचाकी रॅलीला उदंड प्रतिसाद 

एमपीसी न्यूज –  मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके  यांच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी तळेगावमध्ये आयोजित केलेल्या दुचाकी रॅलीला भर पावसातही तुफान प्रतिसाद मिळाला. पावसाबरोबरच सुनीलआण्णा तळेगावकरांच्या प्रेमाच्या वर्षावात चिंब न्हाऊन निघाले. 

गाव परिसरातील पदयात्रेला काल मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आज तळेगाव स्टेशन परिसरात भव्य दुचाकी रॅली काढून शेळके यांनी संध्याकाळी जाहीर प्रचाराची सांगता केली.

तळेगाव स्टेशन येथे हनुमान मंदिरापासून ही दुचाकी रॅली सुरू झाली. हरण्येश्वरवाडी बुद्ध विहार, स्वराज्य नगरी, शोभानगरी, मावळ लँड, शहा कॉलनी, अल्टीनो कॉलनी, हरणेश्वर कॉलनी, साईविहार कॉलनी, वाघेला पार्क, म्हाडा कॉलनी, म्हाळसकर कॉलनी, खांडगे कॉलनी, फलकेवाडी, टेल्को कॉलनी, राजगुरव कॉलनी, तांबोळी वस्ती, विठ्ठलवाडी, स्टेशन चौक, बाजारपेठ, यशवंत नगर, तपोधाम कॉलनी, हॉस्पिटल कॉलनी, सिद्धिविनायक नगरी, विद्याविहार कॉलनी, रेनो कॉलनी, सत्यकमल कॉलनी, मनोहर नगर, स्वामी समर्थ नगर, वनश्री, आनंद नगर, इंद्रायणी कॉलनी, स्वप्ननगरी, जोशीवाडी, अंबिका पार्क, वतन नगर आदी भागातील मतदारांशी या रॅलीच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला.

रॅलीमध्ये शेळके यांच्याबरोबर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, पीडीसीसी बँकेच्या उपाध्यक्ष अर्चनाताई घारे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे, शहराध्यक्ष गणेश काकडे, माजी नगराध्यक्षा सुलोचनाताई आवारे, नगरसेविका हेमलता खळदे, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम आदी मान्यवरांसह तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच काँग्रेस आणि इतर मित्र पक्षातील आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील विविध भागांमधून निघालेल्या या दुचाकी रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पाऊस असूनही तरुणांची गर्दी वाढतच होती. ठिकठिकाणी माता-भगिनींकडून सुनीलअाण्णांचे औक्षण करून स्वागत केले जात होते. आकर्षक रांगोळ्यांनी मार्ग सजविण्यात आले होते. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून जात होता. चिंचोळ्या गल्लीतून पायी चालत नागरिकांच्या गाठी-भेटी घेतल्या जात होत्या. मतदारांकडून शुभेच्छांचा स्वीकार करीत सुनीलआण्णा त्यांची आपुलकीने विचारपूस करत होते. अधून-मधून पावसाच्या सरी बरसात असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहात भरच पडत होती. प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही तळेगावात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावल्याचे स्पष्ट दिसत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.