Pimpri : पिंपरी व चिंचवड भाजीमंडईमध्ये भाजीपाला खरेदीसाठी तुफान गर्दी

एमपीसी न्यूज – जमावबंदीमुळे काही फरक पडत नसल्याने रात्यात सोमवार (दि.23) सायंकाळपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी यातून जीवनावश्यक वस्तू आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ चे भान पाळत भाजीपाला खरेदीला सूट देण्यात आली आहे. पण लोक भाजीपाला खरेदी साठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून सुरक्षेच्या कोणत्याच नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.

सकाळ पासूनच पिंपरी भाजीमंडई आणि चिंचवड भाजीमंडई मध्ये लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसून आले. संचारबंदीला न जुमानता नागरिक गाडी घेऊन बाहेर पडत आहेत व भाजी मंडईमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. बेकरी, दुधाची दुकाने, किराणा दुकानात सुद्धा लोक गर्दी करत आहेत त्यामुळे संचार बंदीचे गांभीर्य लोकांना आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोक गर्दी करता असल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी भाजी मंडई अध्यक्ष सचिन चिखले यांना विचारले असता ते म्हणाले, मंडई गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार बंद ठेवण्याचा निर्णय विचाराधीन आहे.  खरेदीला येणारे ग्राहक सुरक्षेची दक्षता घेत नसल्याने भाजी विक्रेत्यासहित इतर लोकंना मोठा धोका संभवत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान पोलिसांनी बॅरीकेड्स लावून नाके बंदी सुरु केली असून लोकांची चौकशी केली जात आहे. खरच अत्यावश्यक असेल तरच लोकांना सोडले जात आहे. तरीही दुकानात जायचे आहे असे सांगून लोक बाहेर संचार करताना दिसत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.