Pune : चक्क कारचालकालाच मिळाली हेल्मेटसक्तीची दंडात्मक पावती

एमपीसी न्यूज : पुण्यातील करचालकाला हॅम्लेट न घातल्यामुळे 500 रुपयांचे चलान मोबाईल पाठविण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांचा हलगर्जीपणा या प्रकारामुळे समोर आला आहे.

पुण्यातील प्रसाद तुळजापूरकर यांच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

पुण्यात हेल्मेटसक्ती हा कायमच चर्चेला विषय ठरला आहे. नवीन वर्षात चालकांना शिस्त लावून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हेल्मेटसक्तीच्या कारवाईची तीव्र केली आहे. 1 जानेवारी पासून अनेक दुचाकीचालकांना हेल्मेट न घेतल्यामुळे दंडात्मक कारवाई करून 500 रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. यामुळे शहरातील अनेकांनी विरोध देखील केला आहे. परंतु एका करचालकालाच हेल्मेट न घातल्याने 500 रुपयांचे चलान मोबाईलवरती पाठवले आहे. या पावतीवर प्रसाद यांचे नाव आणि चारचाकी गाडीचा नंबर देखील दिला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like