Pune: पंतप्रधान होण्यासाठी मला दोन रूपयाची मदत करा; पुणेकर आजोबांचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज – लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. पंतप्रधानपदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. कोण म्हणतं नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, तर कोणी म्हणत राहुल गांधी तर आणखी कोणी इतरांचं नाव सुचवतो. पण, पुण्यात मात्र काही वेगळंच सुरू आहे. एका 73 वर्षीय आजोबांना पंतप्रधान व्हायचंय आणि त्यांनी आपला प्रचारही जोरात सुरू केलाय..

विजयप्रकाश कोंडेकर असे या आजोबांचे नाव आहे. आताचे राजकारणी खूप गर्विष्ठ असल्याचे सांगत ‘त्यांचा माज उतरवण्यासाठी मला पंतप्रधान व्हायचंय’ अस त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी ते अपक्ष लढणार आहेत. तसेच देशातील सर्व मतदारसंघातून मी अपक्ष उमेदवार लढवेन आणि त्यांना निवडून आणेन आणि त्यानंतर आपलंच सरकार असेल असा विश्वासही त्यांना आहे.

” मी पंतप्रधान, श्री विजयप्रकाश कोंडेकर..16 मे 2019 रोजी जगातील पहिला निर्दलीय प्रधानमंत्री होईल, त्यासाठी मला आज दोन घास भाकरी द्या आणि दोन रुपये मदत करा” असा मजकूर असलेला फलक घेऊन ते सध्या शहरात फिरत आहे. नागरिकही त्यांनी मदत करत विचारपूस करताना दिसतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.