लोणावळ्यासह कार्ला परिसरात गरजूंना जीवनावश्यक साहित्याची मदत

एमपीसी न्यूज : लाॅकडाऊन व संचारबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या गरिब व गरजु कुटुंबांना सर्वच स्तरांमधून मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र लाॅकडाऊनचा कालावधी वाढल्याने सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबांना देखिल जीवनावश्यक वस्तुंची चणचण भासू लागली आहे. कामाधंदे बंद झाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेली कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये, याकरिता लोकप्रतिनिधींसह विविध सेवाभावी संस्थांकडून गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसह अन्नदान करण्यात येत आहे.

दीपक हुलावळे फाऊंडेशनच्या वतीने कार्ला गावातील सातशे कुटुंबांना प्रत्येकी दहा किलो कांदे व प‍ाच किलो बटाटे मोफत वाटप करण्यात आले. कार्ला गावचे माजी सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका कार्याध्यक्ष दीपक हुलावळे यांनी या मदतीसाठी पुढाकार घेतला. फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत कार्ला गाव व परिसरातील साधारण सातशे कुटुंबांना घरोघरी जाऊन जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप केले.

यावेळी माजी उपसरपंच किरण हुलावळे, रविंद्र गायकवाड, नंदु हुलावळे सुनिल शिर्के, सुरेश जाधव, कैलास हुलावळे, भाऊ हुलावळे, राजु हुलावळे, भगवान कोंडभर, नितीन वाडेकर, संतोष केदारी, अतिश हुलावळे, अमोल वायकर, सुनिल हुलावळे, राजु हुलावळे, बाळु चव्हाण, कृष्णा जंगम, दिपक जंगम, सुरेश दळवी, बाळू हुलावळे, गणेश कुंभार, नितेश हुलावळे, अमोल हुलावळे, प्रविण हुलावळे, गणेश हुलावळे, सनी हुलावळे, अक्षय हुलावळे आदी उपस्थित होते.

डोंगरगावातील 110 कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

डोंगरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने  सरपंच सुनिल येवले यांच्या प्रयत्नातून व आशा सेवा केंद्र खंडाळा यांच्या माध्यमातून आदिवासी, दलित संवर्गातील 85 कुटुंबांना व मोलमजुरी करणार्‍या 25 कुटुंबांना सोशल डिस्टन्स चा वापर करून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सरपंच सुनिल येवले, ग्रामसेवक एस.एस.दुबले, उपसरपंच जयश्री दळवी, सदस्य प्रदीप घोलप, शुभांगी कोळसकर, सतिष चव्हाण, सुभाष खोले, दिनेश जायगुडे, ज्ञानेश्वर वाघमारे, अनंता दळवी, संजय जायगुडे, कांताराम दळवी, दत्ता येवले, महेश येवले, पंकज खोले तसेच आशा सेवा संस्थेचे प्रभा सर, धनंजय सर, विल्सन आदि उपस्थित होते.

सुन्नी मुस्लिम समाजाकडून 800 नागरिकांना जेवण वाटप

फराहन शेख फाऊंडेशन व सुन्नी मुस्लिम समाज यांच्या वतीने लोणावळा शहर व ग्रामीण भागातील 800 नागरिकांना दुपारी व रात्री घरपोच जेवणाचे पॅकेट दिले जात आहे. 25 मार्च पासून एक हात मदतीचा या उपक्रमातून ही मदत केली जात आहे. हनिफ शेख, फराहन शेख, जिशान शेख व सुन्नी मुस्लिम ट्रस्टचे पदाधिकारी हे जेवण वाटप करत आहेत.

मानाच्या गणपती मंडळांकडून नाष्टा वाटप

लोणावळा शहरातील मानाच्या पहिल्या पाच गणपती मंडळांच्या वतीने आजपासून पोलीस बंदोबस्तावर असलेले पोलीस कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी, संक्रमण शिबिरातील नागरिक व गरजवंत नागरिक अशा साधारण आठशे ते हजार नागरिकांना सकाळचा नाष्टा वाटप सुरू केले आहे. शहरातील इतर गणेश मंडळांनी देखिल ह्या कार्यात हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.