Chinchwad : अत्यावश्यक सेवेतील वाहतुकीच्या समस्यांसाठी पोलिसांची हेल्पलाईन सुरू

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या संचारबंदी दरम्यान अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सुरू राहणार आहे. या वाहतुकीबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी अथवा माहिती मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे.

9529691966 या क्रमांकावर अत्यावश्यक सेवेतील वाहतूक करणाऱ्यांना संपर्क करता येणार आहे. अत्यावश्यक सेवेची वाहतूक करताना काही अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

रुग्णालय व संबंधित वैद्यकीय आस्थापना, त्यांची उत्पादने व वाटप करणाऱ्या सरकारी, खाजगी आस्थापना (उदा. केमिस्ट शॉप, प्रयोगशाळा, दवाखाने, नर्सिंग होम, रुग्णवाहिका, वैद्यकीय उत्पादने विक्री दुकाने, वैद्यकीय उत्पादनांसाठी लागणारी रसायने, रुग्ण सेवेशी संबंधित व्यक्ती, डॉक्टर परिचारिका, रुग्णालयातील कर्मचारी यांना संचारबंदीच्या आदेशातून वगळण्यात आले आहे.

या सर्वांच्या वाहतुकीबाबत कोणतीही तक्रार अथवा माहिती हवी असल्यास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करता येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.