Pune : अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा! म्हणत शिवसैनिकांचा अलका टॉकीज चौकात जल्लोष

एमपीसी न्यूज – अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा! शिवसेनेचाच मुख्यमंत्री म्हणत अलका टॉकीज चौकात शिवसैनिकांनी बुधवारी दुपारी 4 वा. जल्लोष केला. भगवा ध्वज उंचावत, गळ्यात उद्धव ठाकरे यांचे उपरणे घालून जय भवानी, जय शिवाजी म्हणत घोषणा देण्यात आल्या.

शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे, महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक विशाल धनवडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गुलाल उधळत, फटाके लावून शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद, आशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. शिवसैनिकांचा हा जल्लोष पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.