High Court News : न्यायमूर्ती रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

एमपीसी न्यूज – उच्च न्यायालयातील (High Court News) न्यायाधीश रमेश देवकीनंदन धानुका यांनी आज (रविवारी, दि. 28) मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. धानुका यांना पदाची शपथ दिली.
शपथविधी सोहळ्याला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमल किशोर तातेड, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसेच सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश, राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, पोलीस महासंचालक रजनीश सेठ तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
Pune : भगवद्गीता अनुभवताना…पुस्तकाचे प्रकाशन संपन्न