MLA Shirole : औंध रोड-खडकी स्टेशन वाहतूक कोंडीबाबत उच्चस्तरीय बैठक; आमदार शिरोळे यांचा पुढाकार

एमपीसी न्यूज – नागरिकांना औंध रोड – खडकी रेल्वे स्टेशन येथील वाहतूक कोंडीचा त्रास सतत सहन करावा लागत आहे. तो सोडविण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पुढाकाराने खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्य दुर्योधन भाटकर, ब्रिगेडियर पटवर्धन, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबिन बलेजा यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन रस्त्याची पाहणी करण्यात आली. 

औंध रोड – खडकी रेल्वे स्टेशन चौक येथील अम्यूनेशन फॅक्टरी, डिफेन्स इस्टेट ऑफिस, खडकी कॅन्टोन्मेंट, पुणे महापालिका आणि राज्य सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले आहे व याकरीता या जागेची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागातील रेकॉर्ड तपासून निश्चित केली जाणार आहे.जागेची मालकी निश्चित झाल्यावर सर्व खात्यात समन्वय साधणे शक्य होईल, असे आमदार शिरोळे यांनी बैठकीनंतर सांगितले.

खडकी – औंध रोड येथील रेल्वे ओव्हर ब्रीज खालील रस्ता रुंदीकरणास सर्व खात्यांनी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यास मंजुरी दिली आहे.तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपुलाचा पर्याय वापरता येईल का? या शक्यतेवरही बैठकीत चर्चा झाल्याचे शिरोळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.