Pimpri: भोसरी, गवळीनगर, दिघी, च-होली या ‘हॉटस्पॉट’ भागाकडे शहराचे लक्ष; सर्वाधिक 19 रुग्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील दहा दिवसांपासून दररोज नवीन कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. आजपर्यंत शहरातील 54 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये भोसरी, गवळीनगर, दिघी, च-होली हा भाग येत असलेल्या ‘इ’ प्रभाग कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. या प्रभागात सर्वाधिक 19 रुग्ण आहेत. रात्री पॉझिटीव्ह आलेले दोन रुग्णही च-होलीतील आहेत. त्यामुळे या भागाकडे संपुर्ण शहराचे लक्ष लागले आहे. महापालिकेने देखील काही भाग सील केला आहे.

महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो. त्यामध्ये कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या ‘इ’ प्रभागात सर्वाधिक 19 रुग्ण आहेत. रात्री पॉझिटीव्ह आलेले दोन रुग्णही च-होलीतील असून नकाशामध्ये त्याची नोंद नाही. तर, ‘ब’ आणि ‘ड’ प्रभाग अद्यापपर्यंत कोरोनामुक्त आहेत.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय रुग्ण संख्या!
‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर, मोहननगर, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात (कोरोनाचा एक पॉझिटीव्ह रुग्ण आहे)

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड, काळेवाडी भागात (कोरोनाचा एकही रुग्ण नाही).

‘क’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी), धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात (कोरोनाचे नऊ रुग्ण आहेत)

‘ड’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात (कोरोनाचा एकही रुग्ण नाही).

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात (कोरोनाचे सर्वाधिक 19 रुग्ण आहेत). काल रात्री पॉझिटीव्ह आलेले दोन रुग्णही च-होली भागातील आहेत.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या भागात ( कोरोनाचे दोन रुग्ण आहेत).

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात (कोरोनाचे चार रुग्ण आहेत).

‘ह’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, कासारवाडी, दापोडी,फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात (कोरोनाचे चार रुग्ण आहेत).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.