India Corona Update : गेल्या 24 तासांत  28,637 नवे कोरोना रुग्ण, 551 जणांचा मृत्यू ; रुग्ण बरे होण्याचा दर 62.92 टक्के

Highest one day rise of 28,637 corona positive patients in India with 551 covid19 deaths. देशात गेल्या 24 तासांत  28,637 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.  तर 551 लोकांचा मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रूग्ण वाढण्याचे प्रमाण काय कमी व्हायचे नाव घेत नसून गेल्या 24 तासांत  28,637 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.  तर 551 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 8 लाख 49 हजार 553 झाला आहे. तर, 22 हजार 674 लोकांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रिय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांपैकी 2,92, 258 सक्रीय रुग्ण आहेत. तर 5,34,620 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील रूग्ण बरे होण्याचा दर हा दिवसेंदिवस वाढत असून सध्या देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 62.92 टक्के   आहे तर, सकारात्मकतेचा दर 10.22 टक्के आहे.

आयसीएमआर ने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार, देशात आजवर 1,15,87,153 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत पैकी 2,80,151 चाचण्या शनिवारी (दि.11) करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राला राज्याला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. शनिवारी राज्यात 8,139 नवीन रूग्ण आढळून आले. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा यासह 2,46,600 झाला आहे. तर, 10,116 लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशात अनलॅाकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. आज सलग दहावा दिवस आहे जेव्हा देशात 22,000 हून अधिक कोरोना  रुग्णांची नोंद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.