Chikhli : चिखली भागातील अतिक्रमणे जमीनदोस्त

एमपीसी न्यूज- चिखली भागातील अनधिकृत बांधकामे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने केलेल्या कारवाईत जमीनदोस्त करण्यात आली.

नायर कॉलनी, गणेश हौसिंग सोसायटी, मनीषा कॉलनी, आंगन वाडी, सहयोग, मोरया कॉलनी, गुरुकृपा, गोकुळ, स्वप्न नगरी, सरकार चौक, पेंढारकर चौक, मोरे वस्ती या भागातील रस्त्याच्या कडेला दुकानापुढील व घरापुढील वाढीव अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.

या कारवाईत सोन जेसीबीच्या साहाय्याने २८ पत्र शेड, 37 ओटे, 3 बाथरूम, 13 वाढीव बांधकाम, 4 पडव्या पाडण्यात आल्या. सदर कारवाई कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे 15 पोलीस कर्मचारी स्थानिक पोलीस उपस्थित होते. अशी माहिती प्रभारी प्रशासन अधिकारी सुरेश कोंढरे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.