Hima Das : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी हिमा दासच्या नावाची शिफारस

एमपीसी न्यूज – भारताची आघाडीची महिला धावपटू हिमा दासची यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. आसाम सरकारने यंदाच्या वर्षासाठी हिमा दासचं नाव पाठवलं आहे. आसाम क्रीडा विभागाचे सचिव दुलाल चंद्र दास यांनी हिमाच्या नावाची शिफारस करणारं पत्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला पाठवलं आहे.

हिमाने 2018 मध्ये फिनलँड येथे 20 वर्षांखालील जागतिक चॅम्पियनशीपमध्ये जागतिक विजेतेपद पटकावले होते, अशी कामगिरी करणारी हिमा भारताची पहिलीच धावपटू आहे.

मूळ आसाममधील धिंग या गावची असणारी हिमा दास यंदाच्या वर्षातली खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केलेली हिमा ही सर्वात तरुण उमेदवार ठरली आहे.

हिमा दोससोबत यंदा भालाफेकपटू नीरज चोप्रा, कुस्तीपटू विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, क्रिकेटपटू रोहित शर्मा यांची नावंही खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहेत.

आशियाई खेळांपासून अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हिमाने पदके जिंकली आहेत. 2018 आणि 2019 ही वर्षात हिमा दासने चांगली कामगिरी केली आहे.

2018 साली हिमाला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.