Talegoan : खांडगे स्कूलमध्ये ‘हिंदी दिवस’ उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘हिंदी दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानानुसार १४ सप्टेंबर हा दिवस ‘हिंदी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमाची सुरुवात हिंदी दिनाविषयी माहिती देऊन करण्यात आली. यानंतर विद्यार्थांनी हिंदीमधून अनेक कविता सादर केल्या.

हिंदी दिनानिमित्त शाळेत प्राथमिक गटासाठी ‘वकृत्व स्पर्धा’ तर माध्यमिक गटासाठी ‘वादविवाद’ स्पर्धांचे आयोजन हिंदी भाषेतून करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिक्षकांनीही विविध विषयांवर आपले विचार व्यक्त केले. हिंदी दिनाचे औचित्य साधून शाळेत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळा प्रशासन व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.