Chinchwad : हिंदी भाषा जगण्यासाठी व रोजगार मिळवून देणारी भाषा – डॉ. रजनी रणपिसे

एमपीसी न्यूज – हिंदी भाषा जगण्यासाठी व रोजगार मिळवून देणारी भाषा आहे, असे मत हिंदी विषयाचे तज्ज्ञ डॉ. रजनी रणपिसे यांनी व्यक्त केले.

चिंचवड येथील कमला शिक्षण संस्थेचे, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालय व प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने हिंदी दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयात हिंदी सप्ताह साजरा करण्यात येत असून त्यात हिंदी कविता, हास्य नाटिका, काव्यवाचन, काव्यरचना, गीत आदींचा समावेश आहे. त्याचे उद्घाटन डॉ. रजनी रणपिसे, तेलंग महाविद्यालयाचे हिंदी विभागाचे अध्यक्ष प्रा. दशरथ वाघ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. वनीत कुर्‍हाडे, डॉ. जयश्री मुळे, सी.ओ. डॉ. राजेंद्र कांकरिया, हिंदी विभाग प्रमुख प्रा. रविंद्र निरगुडे, प्रा. सुशील भोंग उपस्थित होते.

डॉ. रजनी रणपिसे पुढे म्हणाल्या, हिंदी भाषेचे महत्व दिवसेंदिवस आज वाढत चालले असून इंग्रजी व मराठी पुस्तकांचे हिंदी भाषेत अनुवाद केले जात आहे. हिंदी चित्रपटाद्वारे या भाषेचा प्रसार देशाबरोबरच जगभरातही आज होताना दिसून येत आहे.

प्रा. दशरथ वाघ म्हणाले, आज इंग्रजी भाषेचा प्रसार देशभरात वाढत असला तरी परकीय भाषा आहे हे विसरुन चालणार नाही. महात्मा गांधीनाही वाटत होते की परकीय भाषेचा देशात वापर करणे म्हणजे इंग्रजी भाषेची गुलामगिरी ठरेल. भारत देशात हिंदी भाषा अनेक राज्यात बोलली जाते म्हणून ती राष्ट्रभाषा करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.