BNR-HDR-TOP-Mobile

चतुरस्त्र अभिनेता इमरान हाशमीसोबत काम करण्यास उत्सुक- आनंद पंडित

एमपीसी न्यूज- आनंद पंडित यांच्या आगामी चित्रपट चेहरे मध्ये इमरान हाशमी हा अमिताभ बच्चन यांच्या सोबत पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात त्यांचे एकत्र काम करणे प्रेक्षकांना नक्कीच भावणार आहे. त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडणार असे आनंद पंडित यांनी सांगितले. आनंद पंडित हे सेटवरील प्रत्येक कामात तितक्याच सर्जनशीलतेने लक्ष देणारे निर्माते आहेत.

अभिनेता इमरान हाशमीने बॉलिवूडमधील आपल्या 16 वर्षाच्या करिअरमध्ये आपल्या अभिनयाने अनेक चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात एक विशिष्ट स्थान प्राप्त केले आहे. इंडस्ट्रीमध्ये इमरान एक चतुरस्त्र अभिनेता म्हणून ओळखला जातो. इमरानच्या या बहुमुखीपणाची भुरळ संपूर्ण इंडस्ट्रीलाच पडलेली आहे.

इमरानचे समर्पण आणि प्रत्येक भूमिकेतील वेगवेगळेपणा आश्चर्यचकित करणारा आहे. निर्मात्याला आपल्याकडून नक्की काय अपेक्षा आहे, प्रत्येक सीन उत्तम करण्यासाठी आपण काय केले पाहिजे याचे अचुक ज्ञान त्याला आहे. इंडस्ट्रीच्या महानायकासोबत काम करताना आणि आपल्या भूमिकेला तितक्याच आत्मियतेने न्याय देणे किती गरजेचे आहे हे त्यांच्या भूमिकेतून दिसून येते. आणि मी या प्रवासाचा भाग होण्यासाठी खुप उत्सुक असल्याचेही आनंद पंडित म्हणाले.

आनंद पंडित मोशन पिक्चरच्या बॅनर्सने आजपर्यंत अनेक आयकॉनिक आणि प्रतिष्ठीत चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्याच यादीमध्ये आता चेहरेचाही सहभाग होणार आहे. अमिताभ बच्चन आणि इमरान हाशमी स्टारर चेहरे हा गुढ थ्रिलर चित्रपट आहे. रूमी जाफरी यांनी दिग्दर्शित आणि आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट निर्मित चेहरे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

.