BNR-HDR-TOP-Mobile

चित्रपट, “ ठाकरे “, बहुआयामी, वास्तववादी

INA_BLW_TITLE

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- हिंदुहृदयसम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मराठी माणसाची अस्मिता, प्रेम जागवणारे व्यक्तिमत्व, ह्यांच्या आयुष्यावर आधारित असलेला “ ठाकरे “ हा वास्तववादी आणि अनेक बारीक सारीक प्रसंगातून परिणाम साधणारा चित्रपट आहे.

सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी उभे राहण्याचे धैर्य, मुत्सद्दीपणा, नेतृत्व, आणि देशाभिमान ह्या विषयी वाटणारे प्रखर प्रेम हे सारे चित्रपटात विविध प्रसंगातून दाखवले आहे. व्यंगचित्रकार म्हणून फ्री प्रेस जर्नल मध्ये नोकरी करीत असतांना त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रातून संपादक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात वाद होतो आणि ते नोकरी सोडून देतात.

कालांतराने आपले स्वतःचे “ मार्मिक “ साप्ताहिक सुरु करतात. त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रातून मराठी माणसाचे प्रेम पहायला मिळते, पुढे मराठी माणसाच्या अस्तित्वाचा ज्यावेळी प्रश्न निर्माण होतो त्यावेळी ते मराठी माणसाच्या बाजूने ठामपणे उभे राहून दाद मागतात. मार्मिकची स्थापना, शिवसेनेची स्थापना केल्यावर त्यांच्या मनात एकच विचार असायचा की मराठी माणुस मोठा व्हायला हवा. योग्यवेळी या सर्वाना जर नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर एक दिवस अराजकता माजेल, माझी लढाई अशीच सुरु राहील, उद्याची पहाट पुन्हा भगवा रंग घेऊन येईल, हिंदुत्वा विषयी त्यांना प्रेम, आस्था होती, हे सारे बारकावे छान दाखवले आहेत.

महानगर पालिकेची निवडणूक जिंकून आपले नगरसेवक त्यांनी तयार केले, आमदार आणि मंत्री शिवसेनेचे झाले. असे अनेक बारीक सारीक प्रसंगातून चित्रपट परिणाम साधून जातो. बाळासाहेब ठाकरे यांना खेळ, संगीत या मध्ये रस होता, औरंगाबाद चे नाव त्यांनी संभाजीनगर ठेवले. त्यांच्या विचारांचा आणि भाषणाचा परिणाम इतका मार्मिक आणि जोरकस व्हायचा कि त्याने सर्वसामान्य माणसात उर्जा निर्माण व्हायची.

चित्रपटाची मांडणी, संकलन, पटकथा ,संवाद संगीत आणि दिग्दर्शन इत्यादी सर्वच बाजू छान जमून आल्या आहेत. नवाजुद्दिन सिद्दिकी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका बारीक सारीक बारकावे आणि कंगोरे दाखवत सादर केली आहे, अमृता राव यांनी मीनाताई ठाकरे यांची भूमिका छान केली आहे. एकंदरीत सिनेमा परिणाम साधून जातो. चित्रपट छान आहे.

वायकॉम 18 मोशन पिक्चर्स, कार्निवल मोशन पिक्चर्स आणि RAUT’ERS एन्टरटेनमेंट, निर्मित आणि संजय राउत यांची प्रस्तुती असलेल्या चित्रपटाचे निर्माते वायकॉम 18 मोशन पिक्चर्स, डॉ श्रीकांत भासी, वर्षा संजय राउत, पुर्वशी संजय राउत, आणि विधीत संजय राउत, हे आहेत, दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केल असून संगीत रोहन आणि रोहन यांचे आहे. या मध्ये नवाजुद्दिन सिद्दिकी आणि अमृता राव यांच्या प्रमुख भूमिका असून त्यांच्या सोबत अनेक मराठी कलाकारांचा सहभाग आहे.

HB_POST_END_FTR-A4

.