Pune : हिंदू जनजागृती समितीचे धुलिवंदन आणि रंगपंचमीला ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियान

एमपीसी न्यूज –  धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून जलाशयात उतरणे हे धर्मशास्त्राविसंगत आहे. हिंदू सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी, तसेच हिंदूंना धर्मशास्त्र माहिती व्हावे यासाठी  ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवले जात आहे. यंदा अभियानाचे 18 वे वर्ष असून 10 आणि 13 मार्च या दिवशी हे अभियान असणार आहे.
हिंदू जनजागृती समितीचे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आज (शनिवारी) पराग गोखले बोलत होते. 

या परिषदेला गार्गी फाउंडेशनचे विजय गावडे, खडकवासला ग्रामपंचायत सदस्य, विजय कोल्हे, रणरागिणी शाखेच्या क्रांती पेटकर, सनातन संस्थेच्या डॉ. ज्योती काळे हे मान्यवर उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

पराग गोखले म्हणाले, मागील 17 वर्षांपासून राबवले जाणारे हे अभियान म्हणजे राष्ट्रीय संपत्तीच्या रक्षणाचे माध्यमच आहे. पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा जलाशय हिंदु सणांच्या नावाखाली दूषित करणे, सर्वथा अयोग्य आहे. पाणी टंचाईचे संकटही राज्याने प्रतिवर्षी पाहिले आहे. अशा परिस्थितीत रंग खेळून पिण्याचे पाणी दूषित करणे दुदैर्वी आहे. हे रोखले जावे यासाठी अभियानात सहभागी होणारे कार्यकर्ते खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून जलाशयाकडे येणार्‍या नागरिकांचे प्रबोधन करतील.

खडकवासला ग्रामपंचायतीचे सदस्य विजय कोल्हे यांनी ग्रामपंचायतीकडून अभियानात होत असलेल्या सहभागाविषयी म्हणाले, गावातील युवक, ग्रामस्थ विविध माध्यमांतून या अभियानात सहभागी होऊन धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या दिवशी धरणात उतरणार्‍यांना परावृत्त करतात. पोलीस प्रशासनालाही गैरप्रकार रोखण्यात या अभियानामुळे साहाय्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.