Pune News : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आरोग्य शिबीर तसेच गरजू मुलांसाठी अन्नदान

एमपीसी न्यूज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पुष्पम बचत गट, समता नगर, वारजे पुणे येथील बचत गटातील महिलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. (Pune News) तसेच वनवासी वसतिगृहातील गरीब आणि गरजू मुलांसाठी अन्नदान करण्यात आले.

सामाजिक जाणीव जोपासली जावी आणि समाजाला त्याचा अधिकाधिक लाभ व्हावा या उद्देश्याने आरोग्य तपासणी,मंदीर स्वच्छता,गरजूंना अन्नदान,शालेय साहित्य वाटप अश्या प्रकारचे विविध उपक्रम नियमितपणे घेतले जातात. याचाच एक भाग म्हणून 16 जानेवारी या दिवशी

आरोग्य शिबिर हे 16 जानेवारी रोजी घेतले गेले. या शिबिरात डॉ. मुक्ता लोटलीकर यांनी महिलांच्या शारीरिक तपासणी सोबत ब्लडप्रेशरची नोंद घेऊन त्यांना आवश्यकतेनुसार (Pune News) वैद्यकीय सल्ला व औषधे लिहून दिली तसेच महिलांसाठी ‘चाळीशी नंतर होणारे आजार आणि घ्यायची काळजी’ या विषयावर मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे समाधान ही केले.

Pimpri News : भारतीय जैन संघटना विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे येथे 20 जानेवारी या दिवशी वनवासी वसतिगृहातील गरीब आणि गरजू मुलांसाठी अन्नदान उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमासाठी वसतीगृहाचे अधीक्षक अमोल डमरे यांचे सहकार्य लाभले. तसेच जीवन ज्योत वसतिगृह सुरज नगर, डावी भुसारी कॉलनी पौड रोड, पुणे येथेही वसतिगृहातील गरीब आणि गरजू मुलांसाठी अन्नदान उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमासाठी वसतीगृहाच्या अध्यक्षा मनीषा जोशी यांचे सहकार्य लाभले.

तसेच  24 जानेवारी रोजी सोमवार पेठ येथील काळाराम मंदिरात हळदीकुंकवाच्या कार्यक्रमानिमित महिलांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.(Pune News) यावेळी डॉ. प्रज्ञा सिडाम यांनी मधुमेह या विषयावर व्याख्यान दिले. महिलांनीही आपल्या शंका विचारून त्यांचे निराकरण करून घेतले तसेच उपयुक्त मार्गदर्शन केल्याविषयी समितीचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.