Sangli News : निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान, संभाजी भिडेंच वादग्रस्त वक्तव्य

एमपीसी न्यूज : सतत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी आज आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले. सांगलीतील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हिंदुस्थान हा निर्लज्ज लोकांचा देश असल्याचे म्हटले आहे. 

या कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे म्हणाले, जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला आपला देश, मग आपला क्रमांक एक नंबर कधी येणार. तो क्रमांक एक आपण मिळवला आहे..कुठल्या गोष्टीत लोकसंख्यमध्ये आपल्याला जमलं नाही चीन पुढे आहे.जो आपला कट्टर दुश्मन मारेकरी पण हिंदू ना मेंदू असतो. यात आपला क्रमांक एक आहे, तो म्हणजे निर्लज्जपणात.

जगाच्या पाठीवरती 187 राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात राहण्याचा बेशरमपणाचा हा देश आहे. लाज वाटत नाही. निर्लज्ज लोकांचं देश म्हणजे हिंदुस्थान आहे. त्या राष्ट्रात राहण्याचा, बेशरमपणाचा हा देश आहे. निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्तान असे संभाजी भिडे म्हणालेत.

यापूर्वीदेखील संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधाने केली होती. दारूची दुकाने उघडी ठेवायला सांगणारे आणि दुर्गामाता दौडीत बंदी घालणारे राज्यकर्ते बेशरम आणि नालायक आहेत. कोरोना अस्तित्वात नाही, सरकारने काहीही करू नये. ज्याला त्याला आपल्या जीवावर सोडून द्यावे. कोणत्या नालायकाने मास्क घालण्याचा सिद्धांत काढला आहे. मास्क लावण्याची गरज नाही.. यासारखे वादग्रस्त विधान त्यांनी यापूर्वी केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.