Hinjawadi Crime: हिंजवडी आयटी पार्कमधून विक्रीसाठी आणलेला 25 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी फेज दोन येथे सापळा लावून एका तरुणाला अटक केली. तो तरुण गांजा विक्रीसाठी हिंजवडी येथे आला होता. त्यांच्याकडून पोलिसांनी 6 लाख 40 हजार 150 रुपये किमतीचा 25 किलो 606 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

योगेश्वर गजानन फाटे (वय 23, रा. जनवाडी, जनता वसाहत, गोखलेनगर पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सहाय्यक पोलीस फौजदार शाकिर जिनेडी यांना एक इसम गांजा विक्री करण्यासाठी हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क फेज दोन, बोडकेवाडी येथे एका कंपनीच्या संरक्षक भिंतीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन अंमली पदार्थ विरोधी पथकाने परिसरात सापळा लावला.

योगेश्वर फाटे कंपनीच्या संरक्षक भिंतीजवळ आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या पोत्यासारख्या पिशवीची झडती घेतली असता त्यात 6 लाख 40 हजार 150 रुपयांचा 25 किलो 606 ग्रॅम गांजा आढळून आला. त्याने हा गांजा विक्रीसाठी आणला असल्याची आरोपीने कबुली दिली आहे. त्यावरून त्याला अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, सहाय्यक पोलीस फौजदार शाकीर जिनेडी, पोलीस हवालदार राजन महाडीक, प्रदीप शेलार, राजेंद्र बांबळे, शकुर तांबोळी, पोलीस नाईक संदीप पाटील, संतोष दिघे, पोलीस शिपाई संतोष भालेराव, अशोक गारगोटे, दादा धस, प्रसाद जंगीलवाड, अजित कुटे, पांडुरंग फुंदे, प्रदीप गुट्टे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.