Hinjawadi : बस प्रवासात 37 हजारांचा ऐवज चोरीस; दोन महिला चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि एक हजार रुपयाची रोकड असा ऐवज चोरून नेला. ही घटना शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान बस प्रवासात घडली.

पूजा धर्मनाथ मुलमुले (वय 35, रा. मु.पो. पांचाळे, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी शुक्रवारी (दि. 1) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन महिला चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी दहा ते सव्वा अकरा वाजताच्या दरम्यान फिर्यादी पूजा आणि त्यांचा मुलगा शिवाजीनगर ते हिंजवडी असा ‘पीएमपीएमएल’च्या बसने प्रवास करीत होत्या. त्यावेळी त्यांच्या शेजारी कडेवर मूल असणाऱ्या दोन महिला उभ्या होत्या. त्या महिलांनी पूजा यांच्या नकळत त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे 36 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि एक हजार रुपये रोख असा 37 हजारांचा ऐवज चोरून नेला. याबाबत पोलीस उपनिरीक्षक भवारी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.