Hinjawadi : गुंतवणुकीचा परतावा न देता आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – गुंतवणूक करण्यास (Hinjawadi) सांगत एका व्यक्तीची आठ लाख 11 हजारांची फसवणूक केली. ही घटना 18 ऑक्टोबर 2018 रोजी रॉयल ओर्चीड हॉटेल, कल्याणीनगर पुणे आणि 25 ऑक्टोबर 2018 रोजी ओर्चीड हॉटेल बाणेर येथे आणि सन 2019 साली घडली आहे.

निखिल रमणिकलाल चोटालिया (वय 32, रा. वारजे, पुणे) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 18) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवीकुमार संगानी (रा. काळेवाडी, पिंपरी), पृथ्वी उर्फ परविंदर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi Fraud : प्लॉट खरेदी करूनही प्लॉट नावावर न करता ग्राहकाची तीन कोटींची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना क्यूनेट कंपनीत आठ लाख 11 हजार 35 रुपये इतके पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी पैसे गुंतवले असता त्यांना ते पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.