Hinjawadi : घरी राहण्यासाठी आलेल्या मुलाच्या मैत्रिणीने पळवले दीड लाखांचे घड्याळ

Hinjawadi: A boy's friend who came to stay at home stole a watch worth Rs 1.5 lakh

एमपीसी न्यूज – घरी राहण्यासाठी आलेल्या मुलाच्या मैत्रिणीने घरातील तब्बल दीड लाख रुपये किमतीचे घड्याळ चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 30) ब्ल्युरीच सोसायटी, हिंजवडी येथे घडली. याबाबत सोमवारी (दि. 1) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदिनी रणजित कोंडाळकर (वय 50, रा. ब्ल्युरीच सोसायटी, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी 29 वर्षीय  संशयित महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित तरुणी ही फिर्यादी यांच्या मुलाची मैत्रीण आहे. ती काही दिवसांपूर्वी फिर्यादी यांच्या घरी राहण्यास आली होती. शनिवारी सकाळी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच या कालावधीत तिने घरातील 1 लाख 64 हजार रुपये किमतीचे स्विस मेक घड्याळ चोरून नेल्याचा फिर्यादी यांचा संशय आहे. त्यानुसार हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.