Hinjawadi : पतीला शिवीगाळ करत पत्नीशी गैरवर्तन करणाऱ्या दोघांवर विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज – दोघांनी मिळून एका दाम्पत्याला शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत महिलेशी गैरवर्तन केले. याबाबत शिवीगाळ करणा-या दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 14) दुपारी दोन वाजताच्या सुमारास कासारसाई येथे घडली.

आनंदा लाटे, सचिन शितोळे (दोघे रा. कासारसाई, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत 29 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी दोन वाजता आरोपींनी फिर्यादी महिला आणी त्यांच्या पतीला शिवीगाळ केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपींनी पिडीत महिलेशी वारंवार गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. महिलेने याबाबत पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.