Hinjawadi : शाळेच्या अकाउंट रूममधून सव्वा लाखाची रोकड लंपास
एमपीसी न्यूज – शाळेच्या अकाउंट रूममधून अज्ञात इसमाने एक लाख 35 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 25) सकाळी सहाच्या सुमारास पीआयसीटी मॉडेल स्कूल येथे उघडकीस आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका मंजू यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी स्टेडियमजवळ पीआयसीटी मॉडेल स्कूल ही शाळा आहे. शाळेतील प्रशासकीय कार्यालयाचे लॅचलॉक तोडून अज्ञात चोरट्याने कार्यालयात प्रवेश केला. तिथे असलेल्या एक असंगणकाच्या कीबोर्डवर ठेवलेली अकाउंट रूमची चावी घेऊन चोरट्याने अकाउंट रूम उघडली.
शाळेतील विद्यार्थ्यांना फूड कुपन देण्यात आले. त्याची जमा झालेली रक्कम अकाउंट रूममध्ये ठेवली होती. चोरट्याने एक लाख 35 हजार रुपयांची फूड कुपनची रक्कम चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.