Hinjawadi : चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना बेड्या

एमपीसी न्यूज – चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणा-या दोन तरुणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली आहे.
नरेश मुन्नीलाल साकीत (वय 27, रा. साईन पनवेल), संदीप लालजी बीन (वय 30, रा. मानखुर्द, मुंबई) अशी कारवाई केलेल्या दोघांची नावे आहेत.

  • पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी मधील लक्ष्मी चौक, मारुंजी आणि टीसीएस सर्कल फेज तीन येथे दोघेजण अंधारात लपून बसल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांना पाहून दोघेही पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पाठलाग करून ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे अंधारात थांबल्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून त्यांना पकडून त्यांच्या विरोधात मुंबई पोलीस अधिनियम कलम 122 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.