Hinjawadi : जागेच्या वादातून तोडफोड करणा-या पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – जागेच्या वादातून गोंधळ घालून तोडफोड केली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी कोकाटेवस्ती, बावधन येथे घडली.

शंकर बाळासाहेब तोडकर (रा. कोकाटे वस्ती, बावधन) व त्याचे चार साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रविण रामचंद्र घुले (वय 36, रा. बोपखेल) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घुले हे बावधन येथील मानव सिटी स्पेसेस या बांधकाम साइटवर सुरक्षारक्षक प्रमुख म्हणून काम करतात. 10 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास आरोपी तोडकर हा आपल्या साथीदारांसह बांधकाम साइटवर आला.

‘ही जागा माझी आहे. तुम्ही येथे थांबू नका, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही’, अशी त्याने प्रवीण यांना धमकी दिली. तसेच प्रवेशद्वारावरील सीसीटिव्ही आणि लाईटच्या वायर कापून टाकल्या. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.