Hinjawadi : लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – लैंगिक अत्याचाराचा गुन्हा ‘ज्या’ आरोपींवर’ दाखल झाला आहे, अशा आरोपींना हिंजवडी पोलिसांनी सहा दिवसानंतर देखील अटक केली नाही. याप्रकरणी शिवशाही व्यापारी संघ महाराष्ट्र राज्यचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिसांकडे आरोपींना अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

युवराज दाखले यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिसांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, 16 जानेवारी रोजी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला धमकी दिल्याचा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणातील आरोपींना हिंजवडी पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही.

या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी. आरोपीला कठोर शासन करून पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी युवराज दाखले यांनी निवेदनाद्वारे हिंजवडी पोलिसांकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.