Hinjawadi : कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; कारचालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या कारने रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या एकाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 17) पहाटे सव्वाबाराच्या सुमारास मारुंजी येथील हॉटेल हंग्रीबर्ड समोर घडली.

सोपान भापकर (रा. शिंदे वस्ती, मारुंजी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत लक्ष्मण झिरपे (वय 34, रा. मारुंजीगाव, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कारचालक स्वप्नील संपत पौळ (वय 25, रा. मारुंजी गाव, ता. मुळशी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सव्वाबाराच्या सुमारास फिर्यादी प्रशांत यांचे मित्र मयत प्रदीप मारुंजी येथील हॉटेल हंग्रीबर्ड समोर रस्त्याच्या बाजूला बोलत थांबले होते. त्यावेळी लक्ष्मी चौकाकडून भरधाव वेगात आलेल्या एम एच 25 / टी 1194 या कारने त्यांना धडक दिली. यामध्ये प्रदीप गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.