Hinjawadi : पार्क केलेल्या कारमधून चोरट्याने दीड लाखांचा ऐवज पळविला

एमपीसी न्यूज – पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्याने दीड लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी (दि. 3) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास म्हाळुंगे येथील सर्व्हिस रस्त्यावर घडली.

पूजा वसंत महाले (वय 29, रा.बाणेर) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पूजा यांचे म्हाळुंगे सर्व्हिस रस्ता येथे न्यारी इम्पेरिअल इमारतीमध्ये कार्यालय आहे. मंगळवारी त्यांनी त्यांची होंडा सिव्हिक कार (एमएच 14 / सीएस 5087) कार्यालयासमोर पार्क केली.

दरम्यान, अज्ञात चोरट्याने मोटारीच्या पाठीमागील बाजूची काच फोडून दोन लॅपटॉप, रोख रक्कम आणि कागदपत्रे असा 1 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पूजा या कारजवळ आल्या असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.