Hinjawadi : किरकोळ कारणावरून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण 

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणास लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री साडेदहाच्या सुमारास शिंदेवस्ती, मारुंजी येथे घडली. 

अभिषेकराजा शैलेंद्रकुमार सिंग (वय 27, रा. जयभवानीनगर, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोहन शांताराम जाधव (वय 21, रा. शिंदेवस्ती, नेरे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिंग यांचे शिंदेवस्ती येथे ‘देशी अर्बन रसोई’ नावाने हॉटेल आहे. फिर्यादी हॉटेलवर असताना आरोपीने किरकोळ कारणावरून त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.