Hinjawadi : माहेरहून पैसे आणण्यास नकार दिल्याने गर्भवती महिलेस मारहाण

एमपीसी न्यूज – माहेरहून पैसे आणण्यासाठी नकार दिल्याने सासरच्या मंडळींनी गर्भवती महिलेस मारहाण केली. यामध्ये महिलेचा गर्भपात झाला. ही घटना मे 2016 ते 27 मे 2019 या कालावधीत घडली.

याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती पंकज नाकाडे, सासरे परशुराम नाकाडे, सासू हौसाबाई नाकाडे, दिर धनंजय नाकाडे, चंदा अशोक घुले, फुलाबाई नाकाडे (सर्व रा. भेंडा खुर्द, ता. नेवासा, अहमदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि पंकज यांचा 2016 साली विवाह झाला. विवाहानंतर सासरच्या मंडळींनी पीडित महिलेकडे वेगवेगळ्या कारणांसाठी सतत माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. पीडित महिलेने वेळोवेळी माहेरून पैसे आणून सासरच्यांना दिले.

मात्र, सासरच्यांची दिवसेंदिवस मागणी वाढत होती. त्यामुळे पीडित महिलेने आपल्या आई-वडिलांकडे पैसे नसल्याचे सांगितले. यावरून सासरच्या मंडळींनी पीडित महिलेस शिवीगाळ आणि मारहाण करत तसेच तिला उपाशी ठेवून तिचा शारीरिक तसेच मानसिक छळ केला.

  • पीडित महिला गर्भवती असताना तिला लाथा-बुक्क्यांनी मारून तिचा गर्भपात केला. याबाबत गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.