Hinjawadi Accident : अंधारात रत्यावर थांबलेल्या ट्रकला टेम्पोची धडक; चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बेंगलोर-मुंबई महामार्गावर सुतारवाडी येथे अंधारात भर रस्त्यावर थांबवलेल्या ट्रकला टेम्पोने धडक दिली. यामध्ये टेम्पोतील एकजण जखमी झाला. तर टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 9) पहाटे साडेतीन वाजता घडली.

_MPC_DIR_MPU_II

अरुल कदरवेल (वय 40, रा. अडगियनतम, तामिळनाडू) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. जयराम गोविंदन (वय 39, रा. अडगियनतम, तामिळनाडू) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रक चालक बादशहा सहीदा शेखसैदा (रा. गुटुर, आंध्रप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बादशहा याने त्याच्या ताब्यातील ट्रक (ए पी 07 / टी सी 6449) बेंगलोर-मुंबई महामार्गावर सुतारवाडी येथे अंधारात धोकादायकरित्या रस्त्यावर थांबवला. त्यामुळे फिर्यादी जात असलेल्या आयशर टेम्पोची (एम एच 43 / बी जी 5682) ट्रकला मागच्या बाजूने जोरात धडक बसली. यामध्ये फिर्यादी जखमी झाले. तर टेम्पो चालक अरुल गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.