Hinjawadi : पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – पिस्तुलाचा धाक दाखवून, पती आणि मुलांना मारण्याच्या धमक्या देऊन महिलेवर शारीरिक अत्याचार करणार्‍या आरोपीला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना जानेवारी 2016 ते मे 2019 या कालावधीत बाणेर येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

बाळासाहेब सदाशिव मुरकुटे (वय 33, रा. बाणेर गाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2016 ते मे 2019 या कालावधीत आरोपी बाळासाहेब याने फिर्यादी महिलेच्या फ्लॅटवर तसेच इमारतीच्या पार्किंगमध्ये कारमध्ये पीडित महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवला. तसेच महिलेच्या पती आणि मुलांना मारण्याच्या धमक्या देऊन तिचे अश्लील व्हिडिओ तयार केले. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी शारीरिक अत्याचार केला. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.