BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : नो पार्किंगमध्ये वाहन लावल्या प्रकरणी 168 वाहन चालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज – नो पार्किंग मध्ये वाहने लावल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाच दिवसात तब्बल 168 वाहन चालकांवर कारवाई केली. ही कारवाई आज (मंगळवारी) सकाळी विप्रो सर्कल येथे करण्यात आली.
हिंजवडी मधील मुख्य रहदारीच्या मार्गावर एकेरी चक्राकार वाहतूक करण्यात आली आहे. ठिकठिकाणी असलेले पंक्चर बंद करण्यात येत आहेत. तसेच नो पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे यांसारखे वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर वाहन चालकांना कंपनीच्या आवारात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे ही वाहने रस्त्याच्या बाजूला पार्क केली जातात.
वाहने रस्त्याच्या बाजूला पार्क केल्यामुळे वाहतुकीसाठी वापरला जाणारा रस्ता अरुंद होतो. पर्यायाने वाहतूक कोंडी होते. हिंजवडी मधील विप्रो सर्कल येथील रस्त्याच्या बाजूला नो पार्किंग परिसरात लावलेल्या वाहनांवर हिंजवडी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. सर्व वाहनांना जॅमर तसेच साखळी लावून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी हजारो रुपयांचा दंड वसूल केला आहे.
HB_POST_END_FTR-A2

.