Hinjawadi : लाच प्रकरणात अटक फौजदाराची रवानगी तुरुंगात; 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या एका उपनिरीक्षकाला फसवणुकीच्या प्रकरणात तक्रारदाराकडून 25 हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहात अटक केली होती. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी थेट कारागृहात करण्यात आली आहे.

मिलन शंतनू कुरकुटे (वय 32) असे अटक केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांनाही आरोपी करावे, अशी तक्रारदाराची मागणी होती. या गुन्ह्याचा तपास अधिकारी असलेल्या उपनिरीक्षक मिलन कुरकुटे याने तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. यातील 25 हजार रुपये घेताना शनिवारी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याला मंगळवारी (दि. 28) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे त्याची रवानगी तुरूंगात करण्यात आली असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.