Hinjawadi : पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून दोघांवर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून सात जणांनी मिळून वडिलांना तलवारीने व मुलाला कु-हाड तसेच लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारत जीवघेणा हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 23) रात्री आठ वाजता सुस येथील ननावरे वस्ती मध्ये घडली. या प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शशिकांत कचरे, विकास कचरे, राखी कचरे, चैताली विकी कचरे, कामिनी धुमाळे (सर्व रा. ननावरे वस्ती, सुस, ता. मुळशी), सोन्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), महेंद्र (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी टिना रशिकांत कचरे (वय 35) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टिना यांच्या मुलाचे आणि आरोपींसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्याबाबत फिर्यादी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांनी शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. आरोपींनी फिर्यादी यांच्या पतीला तलवारीने तर मुलाला कु-हाडीने, लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांचे पती आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

याच्या परस्पर विरोधात राखी शशिकांत कचरे (वय 40) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रशिकांत सोपान कचरे, तुषार रशिकांत कचरे आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.