Hinjawadi : जमिनीच्या वादातून एकाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – गावाकडील जमिनीच्या कारणावरून दोघांनी मिळून एकाला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री साडेनऊ वाजता पुणेरी हॉटेल, बावधन येथे घडली.

रमेश दशरथ तुपे (वय 41, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राज लक्ष्मण खैरे (रा. कोथरूड, पुणे) आणि एक इसम (नाव पत्ता माहिती नाही) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये गावाकडील जमिनीच्या कारणावरून वाद होता. रविवारी रात्री फिर्यादी तुपे त्यांच्या मामाचा मुलगा आणि मित्रासोबत बावधन येथील पुणेरी हॉटेलमध्ये बसले होते. त्यावेळी आरोपी तिथे आला.

आरोपी सोबत असलेला व्यक्ती तुपे यांच्याकडे पाहत होता. त्यामुळे तुपे यांनी त्याला ‘काय पाहतोस?’ असे विचारले. यावरून दोन्ही आरोपींनी तुपे यांना मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.