Hinjawadi : गणपतीची आरास करीत असलेल्या दोन तरुणांना मारहाण

एमपीसी न्यूज – गणपतीची आरास करीत असलेल्या दोन तरुणांना तीन अनोळखी व्यक्‍तींनी मारहाण केली. ही घटना बावधन येथे सोमवारी (दि. 2) पहाटे घडली.

महेश बळीराम पवार (वय 24, रा. गणपती माथा, वारजे माळवाडी, पुणे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी तीन अज्ञात व्यक्‍तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटेच्यावेळी फिर्यादी महेश आणि त्यांचा मित्र बावधन येथील बापूजीबुवा मंदीराजवळ गणपतीची आरास करीत होते. त्यावेळी तिथे आलेल्या तीन अनोळखी व्यक्‍तींनी ‘धक्‍का का मारला’ असे म्हणत फिर्यादी महेश आणि त्यांच्या मित्राला कोणत्यातरी वस्तूने मारहाण करीत जखमी केले. हिजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.