hinjawadi : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Hinjawadi: Bike Rider killed in speedy vehicle collision

एमपीसी न्यूज – दुचाकी वरून जाणाऱ्या तरुणाला भरधाव जाणाऱ्या वाहनाने मागून धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.11) रात्री दहा वाजता माण गावाजवळ झाला. 

आबा बापू पुंड (वय. 23) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी तरुणाची पत्नी शीतल बापू पुंड (वय. 23, रा. समीर पारखे चाळ,  माण गाव, ता. मुळशी, जि. पुणे मुळ गाव. काळेनगर,  औरंगाबाद ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आबा पुंड हा तरुण आपल्या ( एमएच 20 डीएल 6022 ) या दुचाकीवरून माण गावाजवळील रस्त्यावरून जात होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला वत त्याचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1