Hinjawadi: ज्वेलर्सच्या दुकानासमोरून दुचाकी पळवली

hinjawadi: bike stolen in front of Jewelers shop आकाश साठे यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 डीझेड 8544) शुक्रवारी (दि. 19) रात्री साडेनऊ वाजता हिंजवडी येथील सोनिगरा ज्वेलर्स या दुकानासमोर पार्क केली.

एमपीसी न्यूज- ज्वेलर्सच्या दुकानासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि.20) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हिंजवडी येथील सोनिगरा ज्वेलर्स दुकानासमोर उघडकीस आली आहे.

आकाश ज्ञानेश्वर साठे (वय 24, रा. पिंपळे सौदागर, सांगवी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश साठे यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 डीझेड 8544) शुक्रवारी (दि. 19) रात्री साडेनऊ वाजता हिंजवडी येथील सोनिगरा ज्वेलर्स या दुकानासमोर पार्क केली.

रात्री अज्ञात चोरट्यांनी साठे यांची दुचाकी चोरून नेली. ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.