Hinjawadi : हिंजवडीतील पिडीत कुटुंबाचे भाजप महिला मोर्चाकडून सांत्वन

एमपीसी न्यूज- हिंजवडीतील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारासंदर्भात भाजप महिला मोर्चाच्या वतीने पिडीत कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करण्यात आले.

भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा अॅड. माधवी रहाटकर व प्रदेश सचिव उमा खापरे यांच्या सूचनेनुसार पिडीत कुटुंबाची भेट घेतली. पिडीत कुटुंबाला योग्य तो न्याय मिळावा व या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा शैला मोळक, सुरेखा बनकर, शोभा भराडे आदी उपस्थित होते. ‘बेटी बचाव बेटी पढाओ’चे समन्वयक अमित गुप्ता यांनी देखील पिडीत कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.